विराटच्या एकदिवसीय कर्णधारपदवर गावस्करांनी केला सवाल

viart

नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सुरु असलेल्या चर्चाना विराम देत आपण टी २० चे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयाची चर्चा खूप दिवसापासून सुरु होती. मात्र बीसीसीआयने त्याला अफवा म्हणून फेटाळून लावले होते. आता विराटने याची स्वतःहून घोषणा केली आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा समान ठरणार आहे. त्याच्या या निर्णयावर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही विराटच्या या निर्णयानंतर वक्तव्य केले आहे. विराटने टाकलेला पत्र वाचल असल्याचे ते म्हणाले. बीसीसीआय त्याच्या लिमिटेड ओव्हर नेतृत्वावर खुश नव्हती असेही ते म्हणाले. यामुळे टी ट्वेंटीनंतर आता त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदही धोक्यात असल्याची शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कसोटी मध्ये तो चांगले करतोय पण एकदिवसीय कर्णधारपदावर निवडकर्ते काय निर्णय घेतील यावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे.

विराट कोहलीने ४५ टी ट्वेंटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. ज्यात क्रिकेट जगतात टी ट्वेंटी मधील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाचं धक्का दिला आहे. देशाचे टी ट्वेंटीचे कर्णधारपद सोडल्यावर आयपीएलमधील आरसीबीचेही सोडणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या