बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’

बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयावर गावसकर खूश; म्हणाले, ‘मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर…’

gavskar

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला. कोरोना महामारीचे संकट पाहता हा सामनारद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेटने मिळून खेळाडूंच्या आरोग्याचे हित लक्षात घेता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मंडळांच्या संमतीने सामना काही दिवसात घेतला जाईल. हा सामना रद्द झाल्याने  क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. मात्र, या दरम्यान, बीसीसीआयने ईसीबीला पुन्हा पाचवी कसोटी आयोजित करण्यासाठी एक विंडो शोधण्याचा प्रस्ताव दिला आहे.

याच मुद्यावरून आता गावसकरांनी २००८मध्ये मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याकडे लक्ष वेधले आहे. इंग्लंड संघाचे वर्तन न विसरता भारताने सामना पुन्हा आयोजित करण्याचा प्रस्ताव देऊन योग्य काम केले, असे ते म्हंटले आहेत. २००८मध्ये  मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी, इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लिश संघ मायदेशी परतला, पण नंतर करारानुसार दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडचा संघ पुन्हा भारतात परतला.

पण जर त्यांना हवे असते तर त्यांनी भारतात परत येण्यास नकार दिला असता, ‘आम्हाला सुरक्षित वाटत नाही, म्हणून आम्ही परत येणार नाही.’ असेही ते म्हणू शकले असते. केपीने जर येण्यास नकार दिला असता तर प्रकरण तेव्हाच संपले असते.’ पण त्याने तसे केले नाही. त्यावेळी केव्हिन पीटरसनने संघाचे नेतृत्व करत होता आणि तो एक महत्त्वाचा खेळाडू होता.

तसेच गावस्कर पुढे म्हणाले आहेत. ईसीबी आणि बीसीसीआय मधील संबंध अतिशय सकारात्मक आणि मजबूत असल्याचे पाहून सुनील आनंद झाला. पुन्हा सामना आयोजित करण्याबाबत ते म्हणाले, ‘ही चांगली बातमी आहे की बीसीसीआय पुन्हा ही कसोटी आयोजित करण्यास तयार आहे.

महत्त्वाच्या बातम्या