गौतम गंभीरचे मार्मिक ट्विट

वेबटीम : भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय नागरिकांचे ट्वीट च्या माध्यमातून बाल कामगारांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विट च्या माध्यमातून देशातील नागरिकांसमोर एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. गौतम गंभीरने ट्विटवरुन एका बाल कामगाराचा फोटो शेअर करुन देशाच्या भीषण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

गंभीरने फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिलंय की, मित्रा माफ कर आम्ही तुला सध्या मदत करु शकत नाही, कारण आम्हाला आणखी खूप मंदिरं आणि मशिदी बांधायच्या आहेत. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी मी देशातील या परिस्थितीचे उत्तर शोधू शकलेलो नाही. गौतम गंभीरने केलेल्या या ट्विटला आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लोकांनी पसंती दिली असून, पंधराशेहून अधिक लोकांनी त्याने शेअर केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.