Gautam gambhir- गौतम गंभीरला कन्या रत्न

भारताचा धडाकेबाज सलामीवीर गौतम गंभीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.  गंभीरची पत्नी नताशाने एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला असून गंभीरने त्याच्या मुलीचा फोटो ट्विटरवर शेअर करत ही गोडबातमी दिली.
2011 साली विवाह बंधनात अडकलेल्या गंभीर दाम्पत्याला पहिली मुलगी असून बुधवारी गंभीरच्या पत्नीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला आहे. गौतम गंभीरने ट्विटरवरुन ही गोडबातमी दिली.  ट्विटमध्ये गंभीर म्हणतो,
‘आमच्या कुटुंबाला परीची साथ आहे, परीमुळे आमचे आयुष्य उजळून निघाले, आमच्या कुटुंबात नवीन परीचे स्वागत आहे’. दुसरी मुलगी झाल्याने गंभीर आनंदात असल्याचे दिसून येते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुनही भारतीय संघात स्थान न मिळाल्याने गंभीर आणि त्याचे चाहते नाराज होते. गौतम गंभीरने कन्यारत्न झाल्याची घोषणा करताच ट्विटरवर त्याच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे.
[jwplayer iQCa3Sd2]