‘हॉटेलबाहेर रांगेत उभे राहता, मग राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे?

गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राइव्ह

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहायचे की नाही, या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली.आपण एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पाहत उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा तास रांगेत उभे राहू शकतो. मग, ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे, असा रोकठोक सवाल क्रिकेटर गौतम गंभीरने विचारला आहे.

दरम्यान अभिनेता कमल हसन यांनी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. देशभक्ती दाखवण्यासाठी कोणावरही दबाव आणणे किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांनी मात्र राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ थोडावेळ उभे राहण्यास काहीही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते.

You might also like
Comments
Loading...