IPL 2018: गंभीरऐवजी श्रेयस अय्यर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदी

वेब टीम- गौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे गंभीरऐवजी आता श्रेयस अय्यर दिल्लीची धुरा सांभाळणार आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्स ज्या स्थानी सध्या आहे त्यासाठी मी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे कर्णधारपदावरुन मी पायउतार होत आहे. नवा कर्णधार श्रेयस अय्यर असेल. संघ म्हणून आम्ही एकत्र आहोत , परिस्थिती बदलण्याची क्षमता या संघात आहे- गौतम गंभीर

आयपीएलच्या चालू मोसमात गंभीरचा फॉर्मही कर्णधारपदाला साजेशा नाही. गंभीरने ६ सामन्यात केवळ ८५ धावाच केल्या आहेत, तर दिल्लीने 6 पैकी केवळ एकच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध  जिंकला आहे.