नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला रविवारी पुन्हा एकदा ISIS काश्मीरकडून धमकीचा मेल आला आहे, या मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी देखील गंभीरला ISIS काश्मीरकडून पहिला धमकीचा मेल आला होता. यानंतर आता हा तिसऱ्यांदा मेल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप खासदार गौतम गंभीर यांना त्यांच्या कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 1.37 च्या सुमारास हा मेल आला. सूत्रांनी सांगितले की मेलमध्ये असे लिहिले आहे की, दिल्ली पोलिस आणि आयपीएस श्वेता काहीही करू शकत नाहीत कारण त्यांचे गुप्तहेर देखील दिल्ली पोलिसांमध्ये सामील आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देत आहेत. याआधी 24 नोव्हेंबरला गौतम गंभीरलाही ISIS काश्मीरकडून एक मेल आला होता. या मेलनंतर गौतम गंभीर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती.
दुसऱ्या मेलमध्ये आरोपीने व्हिडिओसह मेल पाठवला होता. ज्यामध्ये गंभीरच्या घराचे फुटेज होते. मात्र, हा त्याच्या घराबाहेर काढलेला जुना व्हिडिओ असल्याचे पोलिसांना आढळून आले. आयपी अॅड्रेस मिळवण्यासाठी पल्स गूगलला मेल पाठवतात. सेंट्रल डिस्ट्रिक्ट पोलिसांच्या सायबर सेल टीमने स्पेशल सेलकडे केलेल्या तपासात असे आढळून आले की हा ईमेल मूळचा कराची, पाकिस्तान मधून पाठवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<