fbpx

गौतमवर दोन व्होटर आयडी असल्याचा ‘आप’ चा ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : दिल्लीतील पूर्व दिल्ली लोकसभा मतदारासंघाची लढाई आता मतदारसंघाबाहेर कोर्टातही सुरू आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी यांनी भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर दोन व्होटर आयडी असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.‘जेव्हा एखाद्याकडे व्हिजन नसते कोणताही मुद्दा नसतो तेव्हा अशा पद्धतीचे निगेटिव्ह राजकारण केले जाते,’ असे प्रत्युत्तर गौतम गंभीरने दिले आहे.