fbpx

फक्त ‘या’ व्यक्तीमुळेचं गौतम गंभीर राजकारणात

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता क्रिकेटचे मैदान सोडून राजकारणाच्या मैदानात चौकार आणि षटकारांची आताषबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गंभीरने भाजपमध्ये प्रवेश करून त्याने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

राजकारणाच्या प्रवेशाबाबत विचारले असता ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक विचार करतात. नरेंद्र मोदी करत असलेलं काम पहून आजची पिढी राजकारणात येण्यासाठी प्रेरित होत असल्याचं गंभीरनं म्हटलं आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्याचं गंभीरनं म्हटलं आहे. तसेच क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम असलं तरी लोकांची सेवा करण्याची माझी इच्छा असल्याचंही गौतम गंभीर पुढे बोलताना म्हणाला.

लोकांना भावनिक मुद्यांमध्ये अडकवून केजरीवाल राजकारण करत आहेत. तसेच मागील ४ वर्षात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला मुर्ख बनवले असल्याची टीकाही गंभीरने केजरीवाल यांच्यावर केली आहे.