क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या धोनीला गंभीरने फटकारले, म्हणाला…

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. त्यांची कामगिरीही दमदार राहिलेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून त्याला कामगिरीत सातत्य राखण्यास अपयश आले आहे. तसेच तो विश्वचषकापासून क्रिकेटपासून दूर आहे.

महेंद्रसिंग धोनी विश्वचषकानंतर भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. परंतु तो आता माघारी परतला आहे. तरीही तो सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.याविषयी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाष्य केले आहे.

गौतम गंभीरने निवृत्ती स्वीकारणे हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे. मी प्रत्येकाच्या निर्णयाचा आदर करतो. पण मला असं वाटतं की आता निवड समिताच्या सदस्यांनी धोनीशी चर्चा करायला हवी. त्याच्या भविष्यात काय योजना आहेत, ते विचारायला हवं. पण एक मात्र नक्की की जर तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत आहात, तर तुम्ही कोणती मालिका खेळायची आणि कोणती मालिका खेळायची नाही याची निवड तुम्ही करणं चुकीचं आहे अशा शब्दात धोनीला फटकारले आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी याने आपल्या खेळीने आणि नेतृत्व गुणांनी क्रिकेट रसिकांची माने जिंकली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली टी-२० विश्वचषक तसेच २०११ चा वनडे विश्वचषक, २०१३ चॅम्पियन ट्रॉफी, तसेच कसोटी क्रिकेट भारतीय संघाला अव्वलस्थानी पोहचवले आहे.

महत्वाच्या बातम्या