‘अधिकारी ब्रदर्स’चे प्रमुख गौतम अधिकारी यांचे निधन

gautam-adhikari-passes-away

मुंबई :’अधिकारी ब्रदर्स’चे प्रमुख गौतम अधिकारी यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गौतम अधिकारी यांच्या मागे पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. गौतम यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गौतम अधिकारी मनोरंजन क्षेत्रातील मोठे नाव आहे. हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलचे ते संस्थापक होते.
गौतम यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात विक्रम केला आहे. सर्वाधिक एपिसोड्सचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारी यांनी रचला आहे. याची ‘लिम्का बुक’मध्ये नोंद करण्यात आली आहे. गौतम यांच्या निधनामुळे टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे