असे करा गौरींचे आवाहन,पूजनआणि विसर्जन

बीड /कृष्णा रामदासी;गौरी ही देवता नक्षत्र प्रधान देवता आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरी आणाव्या लागतात व त्यांची स्थापना करावी लागते. अनुराधा नक्षत्र जोपर्यंत आहे तो पर्यंत कुठल्या पण वेळी त्यांचं आवाहन केले तरी चालते.आणताना कुलदेवतेसमोर मुखवटे ठेऊन वाजत गाजत आणावे आणि मग स्थापना करावी लागते.आवाहनाच्या दिवशी गौरींची पंचोपचार पूजन करून फराळाचा किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करून आरती करावी.
दुसरे दिवशी जेष्ठ नक्षत्रावर त्यांची महापूजा केली जाते. पूजेसाठी सोळा उपचार आवश्यक आहे (षोडशोपचार पूजा) सोळा पत्र्या वाहून(पाने) त्यांची पूजा करावी. त्यादिवशी नैवेद्यामध्ये सोळा भाज्या,सोळा चटण्या, पुरणाच्या पोळीचा महानैवेद्य अर्पण करून पंचारती करावी. त्यादिवशी संध्याकाळी पुन्हा पंचोपचार पूजन करून पेढ्याचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवून आरती करावी.

तिसऱ्या दिवशी त्यांची षोडशोपचार पूजन करून खिर कानवल्याचा नैवेद्य दाखवून आरती करावी व मूळ नक्षत्रावर त्यांचं विसर्जन करावं.अशा प्रकारे गौरींचे प्रतिवार्षिक पूजन केल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो व आपल्याला सुख,शांति, समाधान मिळते…!!

Loading...

श्री गौरी (महालक्ष्मी) आवाहन मुहूर्त :
श्री गौरी (महालक्ष्मी) चे तीन दिवसाचे हे व्रत नक्षत्रप्रधान अनुराधा , जेष्ठा व मूळ नक्षत्रावर केले जाते या वर्षी भाद्रपद शू .८ मंगळवार दि. २९-०८-१७ रोजी आवाहन स्थापना करावी.या दिवशी सम्पूर्ण दिवस अनुराधा नक्षत्र असल्याने आपल्या कुळाचाराप्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी गौरी(महालक्ष्मी) चे आवाहन करावे . या दिवशी दिवसभर वैधृती योग असला तरी त्याचा स्थापनेस निषेध नाही. स्थापना करता येते. मंगळवारचा योग प्रशस्त आहे.तसेच भद्रा प्रारंभ दि .२८-०८-२०१७ ला रात्री १२:३३ पासून दुसऱ्या दिवशी दुपारी ०१:४१ मी. पर्यंत भद्रा आहेत.(गौरी (महालक्ष्मी) स्थापनेसाठी भद्रेचा निषेध नाही ) त्यामुळे भद्रा काळात गौरी (महालक्ष्मी) स्थापना करण्यास काही हरकत नाही.राहू काळ दुपारी ३:०० ते ४:३० पर्यंत आहे. (राहू काळात शुभकार्य वर्ज आहे )

श्री गौरी- पूजन विशेष माहिती

मंगळवार दिनांक २९ अॉगस्ट २०१७ रोजी "गौरी आवाहन" आहे.मंगळवार दि.२९ अॉगस्ट २०१७ रोजी गौरी आवाहना करीता अनुकूल असणारे "अनुराधा" नक्षत्र दिवसभर आहे. परंतु वैधृती नावाचा अशुभ योग सुद्धा दिवसभर असल्यामुळे गौरी आवाहन अभिजित् मुहूर्तावर म्हणजे ‘दुपारी १२.१० ते दुपारी १.००’ वाजेपर्यंत* केव्हाही करता येईल. गौरी आवाहनासाठी साठी शुभ/लाभ/अमृत असे कोणतेही विशेष मुहूर्त शास्त्रात नसतात.

बुधवार दि. ३० अॉगस्ट २०१७ रोजी गौरीपूजनासाठी आवश्यक असणारे असे ज्येष्ठा नक्षत्र दिवसभर असल्यामुळे गौरीपूजनासाठी सुद्धा विशिष्ट अशी शुभवेळ/ मुहूर्त पाहू नये.गुरूवार दि. ३१ अॉगस्ट २०१७ रोजी गौरीविसर्जनासाठी अनुकूल असणारे मूळ नक्षत्र दिवसभर असल्याने अर्थातच गौरी विसर्जन आपण दिवसभरात कधीही करु शकतो.तसेच आपापल्या गौरी आवाहन यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे "राहुकाळ" असलेल्या वेळेत सुद्धा-गौरी पूजन केले तर चालते.बुधवार दि. ३०-०८-१७ रोजी गौरी (महालक्ष्मी) पूजन व महानेवेद्य करावा.या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र सम्पूर्ण दिवसभर आहे.या दिवशी महालक्ष्मीचे पूजन महानैवेद्य करावा.या दिवशी राहू काळ दुपारी १२:०० ते १:३० पर्यंत आहे.( राहू काळात शुभकार्य वर्ज आहे )

gauri-pooja आवाहन

श्री गौरी (महालक्ष्मी) विसर्जन मुहूर्त :
गुरुवार दि. ३१-०८-१७ रोजी मूळ नक्षत्र दिवसभर असल्यामुळे या नक्षत्रावर गौरी (महालक्ष्मी) चे आपल्या कुलाचारा प्रमाणे गौरी महालक्ष्मी विसर्जन करावे.या वर्षी गौरी (महालक्ष्मी) चे वाहन कोबडा असून ती भात भक्षण करीत आहे. तिने तांबडे (लाल ) रंगाचे वस्त्र तिने धारण केले असून शस्त्र म्हणून तलवार हातात घेतले आहे.कस्तुरीचा तिलक लावला आहे. ती दक्षिणेकडे पाहत आहे. या महालक्ष्मीचे फल जनतेला दुर्भिक्षकारक आहे.

गौरींचे पूजन; समज- गैरसमज

भाद्रपदातील गौरी काही जणांकडे उभ्या असतात,तांब्यावर,सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे गौरी पूजन करावे.नव्याने गौरी पूजन सुरू करताना कोणी नातेवाईकांनी महालक्ष्मी (गौरी) द्याव्या लागतात हा गैरसमज आहे. ती व्यक्ती स्वतः महालक्ष्मी बाजारातून आणू शकते.
घरातील व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाचे आत (नेहमी प्रमाणे) कुलाचार प्रमाणे गौरी पूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर,सुगडावर, बसविण्यास सांगितले जाते यास कोणताही आधार नाही,केवळ भावाने पोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमी प्रमाणे करावे.गौरी विसर्जन मूळ नक्षत्रावर करावयाचे असल्याने मंगळवारी,शुक्रवारी तसेच कोणत्याही वारी करता येते.घरातील कोणाचा मृत्य झाल्यास त्या वर्षी गौरी पूजन आपल्या कुलाचारा प्रमाणेच करावे.काही मंडळी फक्त मुखवटे बसवितात, गौरी उभ्या करू नयेत अश्या सर्व प्रथा चुकीच्या आहेत . तसेच भाद्रपदात गौरी पूजन न करता दिवाळीत गौरी पूजन करतात हे हे शास्त्र संमत नाहीअश्या कुठल्याही रूढी परंपरा सुरु करू नयेत, याने आपल्या धर्माचा ऱ्हास होतो.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?