गौरी  लंकेश यांच्या हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडुन निषेध

gauri lankesh हत्या

राहुरी, तालुका. ११ (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्यच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्र  हादरून गेलं आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या वतीने सर्व जिल्हयांत जाहीर निषेध करत आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगळुर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना गोळ्या झाडुन क्रुरतेने हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या करून वास्तव दाबण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा दिसतो. या घटनेमागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे. विचारांचा लढा विचारानेच हवा रक्तपाताने नव्हे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे खरे सुत्रधार कोण आहेत हे समोर यावेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर भुमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सर्व जिल्हयांत व दिल्ली, बेळगाव, गोवा या ठिकाणी पत्रकार संघ लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय सरचिटणीस गोविंद घोळवे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, रणधीर कांबळे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, वृत्त वाहिणी संघाचे अध्यक्ष मनिष केत, दिल्ली संपर्क प्रमुख सुरेश चव्हाणके, रघुनाथ सोनवणे, गोवा संपर्क प्रमुख शिवाजी नेहे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळये, राज्य ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, कुंदन जाधव, सोमनाथ देशकर, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, कोकण विभाग प्रमुख उपेंद्र बोर्‍हाडे, खानदेश प्रमुख किशोर रायसाखडा, गडचिरोली विभाग प्रमुख व्यंकटेश दुधमवार, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, मंत्रालय प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर, सुरेखा खानोरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हरिष यमगर, दिपक कांबळे, नवनाथ जाधव, सागर जोंधळे, डॉ. अभयकुमार दांडगे आदींसह राज्यातील पदाधिकार्‍यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले