‘यामुळे’ उलगडणार गौरी लंकेश यांच्या हत्येचं रहस्य

नवी दिल्ली :  ५ सप्टेंबर २०१७ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे गूढ आता लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हैसूरू येथील प्रा. के एस भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून, हे चौघेही एका हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत.

अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित देगवेकर उर्फ प्रदीप मनोहर इडवे सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय ३७, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे आता लवकरच गौरी लंकेश यांच्या हत्ते प्रकरणी महत्वाचे धागे -दोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...