Share

Nitesh Rane । “गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे, दिशा सालियान, सुशातसिंग राजपूत…”; नितेश राणेंच्या ट्विटने चर्चांना उधाण

(Nitesh Rane) मुंबई :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ठाकरेंकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आलाय. याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे (Gauri Bhide) यांच्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. नितेश राणेंच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे असूनही कारवाई होत नाही, असा आरोप करत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सर्वांना प्रतिवादी करण्यात यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आलेली आहे. यासंदर्भात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत गौरी भिडे यांच्या संरक्षणाची मागणी केली आहे.

“गौरी भिडे हिच्या जिवाचे रक्षण व्हावे, महाराष्ट्र राज्य शासानाने तिला त्वरित पोलीस संरक्षण द्यावे. दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांचे काय झाले ते आम्हाला माहीत आहे. ” असं आमदार नितेश राणेंनी ट्वीटमध्ये म्हटल आहे.

काय आहे प्रकरण?

दादरमध्ये वास्तव्यास असलेल्या गौरी भिडे (Gauri Bhide) आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ हा प्रकाशन छापखाना ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या ‘प्रबोधन’ छापखान्याच्या शेजारीच होता. ‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ या मोदींच्या आवाहनानं प्रेरित होत त्यांनी ही याचिका असल्याचं सांगितलं आहे. ठाकरे कुटुंबाने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आणि बेहिशेबी मालमत्ता जमा केली हे सांगणारी कागदपत्रे याचिकेसह जोडण्यात आली आहेत. कोणत्याही राजकीय पक्षात स्वत: अधिकृत पद धारण करणे, हे उत्पन्नाचे कायदेशीर स्त्रोत असू शकत नाही. त्याचप्रमाणे, कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची घटनात्मक पदे धारण करणे हे देखील उत्पन्नाचे साधन नाही. उद्धव, आदित्य आणि रश्मी यांनी कधीही कोणत्याही विशिष्ट सेवा, व्यवसाय आणि व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत स्त्रोत उघड केले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

(Nitesh Rane) मुंबई :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. शिवसेना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now