अंकिता लोखंडेच्या घरी गौरीचे आगमन; शेअर केले खास फोटो

अंकिता लोखंडे

मुंबई : समृद्धी व मांगल्यांचे प्रतिक समजल्या जाणा-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा उत्सव राज्यभरात साजरा केला जातो. काल गौरीचे घरोघरी आगमन झाले, गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर दोन दिवसानी गौरी उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. नुकेतच अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरी देखील गौरीचे आगमन झाले आहे. याचे सुंदर फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो गौरी आगमनाचे काही फोटो शेअर केले आहे. अंकिताने सुंदर फोटो शेयर करत सर्वांना आपल्या घरातील गौराईचं दर्शन दिल आहे. तसेच यादिवशी तिने सुंदर लुक करत महाराष्ट्रीयन नथ देखील घातली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांचा लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, महालक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीप्रमाणे नऊवारी साड्या नेसून महालक्ष्मीला मोतीहार, पुतळीहार, बाजूबंद, कंठी, ठुशी अशी आभूषणांसह फुलांची कमान, फुले, मखर, दागिन्यांपासून ते महालक्ष्मीसमोर पदार्थ व ठेऊन मनमोहक सजावट केली जाते. तीन दिवसांच्या उत्सवासाठी घराघरात मखर तयार करण्यात येतात. त्यावर विद्युतरोशनाई करण्यात येते, शहर व ग्रामीण भागात उभ्या, बैठ्या, सुदावरच्या व नवसाच्या महालक्ष्मी मुखवठ्याची परंपरेनुसार प्रती स्थापना करण्याची पद्धत आहे.

महत्वाच्या बातम्या :