गौतम गंभीरने ‘या’ महिला नेत्याला पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

Gambhir gautam

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशातील राजकीय वातावरण खूपच तापले आहे. सगळेच नेते एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. माझ्याबद्दल आक्षेपार्ह आणि अश्लिल विधानं असलेले पत्रक गौतम गंभीर यांच्या कार्यकर्त्यांनी वाटले असा आरोप पूर्व दिल्ली मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गुरुवारी केला होता. हा आरोप फेटाळत आता गौतम गंभीर याने आतिशी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.

अतिशी यांनी गौतम गंभीरवर वेगवेगळे आरोप केले होते ते ऐकून गंभीर चांगलेच नाराज झाले आहेत, त्यांनी आता थेट ‘आप’ला आव्हान दिलं आहे. ‘जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी तत्काळ राजकारणातून निवृत्त होईन. त्यांनी २३ मेपर्यंत पुरावा दिला, तरी मी राजकारण सोडून देईन. पण जर अरविंद केजरीवाल यांनी पुरावे दिले नाहीत, तर २३ मेनंतर ते राजकारण सोडतील का?’ असा सवाल गंभीरने उपस्थित केला.

Loading...

गुरुवारी संध्याकाळी गौतम गंभीर यांना आप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केलं. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने आतिशी मार्लेना आणि अरविंद केजरीवाल यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. आता अरविंद केजरीवाल आणि आतिशी या नोटीसला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील