औरंगाबादेत गॅस्ट्रोमुळे भीतीचे वातावरण

टीम महाराष्ट्र देशा – औरंगाबाद शहरातील छावणी भागात अचानक नागरिकांना उलट्या आणि पोटाचा त्रास सुरू झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काल रात्रीपासून जवळपास 2 हजार पेक्षा अधिक नागरिकांना हा त्रास सुरू झाला.

bagdure

पोटात दुखणे, मळमळणे आणि उलट्यांचा त्रास हा दूषित पाण्यामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान काल रात्री काही रूग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलंय. तर काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती. रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने दवाखान्यातील एक एका खाटांवर दोन दोन रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले परंतु एव्हढ्यावरही जागा अपुरी पडत असल्याने जमिनीवरही रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत यामुळे जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. काल रात्री 10 वाजेपर्यंत 2000 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याचं येथील डॉक्टरांनी सांगितलं.

You might also like
Comments
Loading...