पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सर्वसामान्यांना बसणार फटका

petrol pump

टीम महाराष्ट्र देशा: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी सोमवारी उच्चांक गाठला आहे. सोमवारी दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरांनुसार डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रुपयांवर पोहोचला आहे. तर पेट्रोलने ७१ रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.

Loading...

तेल कंपन्यांच्या दर तक्त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर २०१४ ऑगस्ट नंतर प्रथमच एवढे वाढले आहेत. मुंबईत प्रती लीटर डिझेलची किंमत ६५.७४ रूपयांवर पोहोचली आहे. याची तुलना करायची झाल्यास गेल्या महिन्याभरात डिझेलच्या प्रती लीटर दरात ३.४० रुपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलची किंमत २.०९ रूपयांनी वाढली आहे. तर पुण्यात ७८.८९ तर डिझेल ६४.६६ रुपये प्रतिलिटर होते. १२ डिसेंबर २०१७ पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत.

पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर पुढीलप्रमाणे

मुंबई – पेट्रोल ७९.१५ रु. डिझेल ६५.९० रु.

पुणे – पेट्रोल ७८.८९ रु. डिझेल ६४.६६ रु.

नाशिक – पेट्रोल – ७९.४८ रु. डिझेल ६५.२५रु.

औरंगाबाद – पेट्रोल – ८०.०८ रु. डिझेल ६६.८४ रु.

रत्नागिरी – पेट्रोल – ७९.७४ रु. डिझेल ६५.६४ रु

1 Comment

Click here to post a comment







Loading…










Loading…

Loading...