मनसेने केले गॅस मेकॅनिकलचे भांडाफोड

ठाणे : गॅस एजन्सीकडून येणा-या मेकॅनिकलचे खरे रुप मनविसेने उघड केले आहे.अनेक वेळा हे मेकॅनिक घरी येऊन शेगडीमध्ये बिघाड असल्याचे सांगत ग्राहकांकडून पैसे उकळतात. गॅस मेकॅनिकलकडून होणारी ही लूट मनविसेने उघडकीस आणली आहे.

हा लुटीचा प्रकार थांबविण्यासाठी मनविसेचे शहराध्यक्ष सागर जेधे यांनी ग्राहकांच्यावतीने गॅस एजन्सीसमोर संबंधित प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे सादर केले आहे. डोंबिवलीमध्ये राहणा-या एका व्यक्तीच्या घरी गॅस मेकॅनिक चेकिंगसाठी गेला. यावेळी शेगडी खराब असून दुरुस्तीसाठी ९०० रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. परंतु शेगडीला १ वर्षाच्या वॉरंटी असल्याने या ग्राहकाने बजाज कंपनीच्या माणसाला बोलावून तक्रार केली.

यावेळी केलेल्या तपासात शेगडीत काहीच बिघाड नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पुन्हा गॅस मेकॅनिकलला बोलावले असता त्याने त्याची चूक कबूल केली.

You might also like
Comments
Loading...