विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला!

आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वधारल्याने विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 86 रुपयांनी वाढले असून आता विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांना मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी गॅस अनुदान सोडले आहे किंवा ज्या ग्राहकांचा वर्षभरातील 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला आहे, त्यांना विनाअनुदानित गॅस सिलेंडर 737.50 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे.
तेल कंपन्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरातही 13 पैशांची किरकोळ वाढ केली आहे. त्यामुळे त्याचे दर आता 434.93 रुपये झाले आहेत. यासोबतच तेल कंपन्यांनी विमान इंधनाचे दरही 214 रुपये प्रति किलोलिटर वाढवल्याने, त्याचा दर 54,293.38 रुपये झाला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी विमान इंधनाच्या दरात 3 टक्क्यांनी वाढ केली होती.