fbpx

गॅरी कर्स्टन रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे नवे प्रशिक्षक

royal challengers

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने गेली आठ वर्ष संघासोबत खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भुमिका पार पाडली. त्याच्या जागी प्रशिक्षकाची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे सोपवली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर कर्स्टन यांनी 2018च्या सत्रात बंगळूरुच्या फलंदाज प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. कर्स्टन यांच्याकडे जवळपास 700 सामन्यांचा (वन डे, कसोटी आणि प्रथम श्रेणी) अनुभव आहे आणि त्यांच्यानावावर एकूण 40,000 धावा आहेत.