शिफारस करून देखील आदिती नलावडे आणि शिवाजी गर्जेंच्या आमदारकीला ब्रेक ? चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या रिक्त झालेल्या दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि मुंबई संघटक अदिती नलावडे यांच्या नावांची शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महिन्यापूर्वी केली असली, तरी राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

याबाबत राज्यपालांतर्फे विधानपरिषदेवर साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवेचे विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड केली जावी, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

Loading...

राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर आणि रामराव वडकुते हे राज्यपाल नियुक्त सदस्य होते. यापैकी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते निवडूनही आले. तर रामराव वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही रिक्त जागी संघटनेत निष्ठेने काम करणाऱ्या गर्जे व आदिती नलावडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आदिती नलावडे?

खासदार सुप्रिया सुळे यांनी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून आदिती नलावडे या संघटनेत कार्यरत आहेत. नलावडे यांनी परदेशात उच्चशिक्षिण घेतलेले आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती. मात्र ऐनवेळी सुरेश माने यांना संधी देण्यात आली. ती कसर आता विधानपरिषदेच्या आमदारकीने पक्षाने भरून काढली आहे. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने त्यांच्याकडे डिजिटल प्रचाराची जबाबदारी दिली होती. तसेच मुंबईत विविध प्रश्नांवर त्यांनी अनेकवेळा रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत.

कोण आहेत शिवाजीराव गर्जे?

शिवाजीराव गर्जे १९९९ पासून कार्यरत आहेत. माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे पक्षाचे प्रशासकीय कामकाज पाहतात. दिवंगत नेते गुरुनाथ कुळकर्णी यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातील प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...