कचरा प्रश्न औरंगाबाद: कचरा आता दुग्धनगरीत टाकणार

garbage-aurangabad

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा देत विभागीय आयुक्त यांच्या कमिटीने यावर निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले होते. डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायांवर विचार करून चिकलठाणा येथील ३५ एकर जागा निवडली.

पाच एकर जागेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांआधारे ओल्या कचऱ्यांचे  कंपोस्टिंग आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल. झोनमधील जागेअभावी ज्या हे. पाच एकर जागेपैकी ३ एकर जागेत ओला आणि २ एकर जागेत सुका कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. आजपासून शेड व इतर बांधकाम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

येत्या ७ दिवसांच्या आत हे काम पूर्ण होईल व तिथे कचरा नेला जाईल, काही वर्षांपूर्वी मनपाला शासनाने दुग्धनगरी उभारण्यासाठी ही चिकलठाण्यातील ३५ एकर जागा दिली होती. मनपाला तेथे दुग्धनगरी उभारने शक्य झाले नाही. त्यामुळे तशीच पडून राहिलेल्या या जागेवर कचऱ्यावर कंपोस्टिंग आणि प्रोसेसिंग करण्यात येईल नागरिकांनी विरोध केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.