घाटी रूग्णालयात कचरा कोंडीने आरोग्य सुधारण्याऐवजी धोक्यात

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या परिसरातील वैद्यकीय, ओला व सुका कचरा महापालिकेने गेल्या आठवडाभरापासून उचललेला नसल्याने घाटीची कचरा कोंडी झाली आहे.

कचरा जमा केलेल्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने शेजारीच असलेल्या चार शाळा महाविद्यालयांच्या साडे तीन हजार विद्यार्थीचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाटी प्रशासन महापालिकेच्या अधिकार्यां ना वारंवार विनंती करूनही कचरा उचलल्या जात नसल्याने मेटाकुटीला आले आहे.