लोकनेते मारुतरावजी घुले पाटील जयंती निमित्त भेंड्यात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

 भेंडा(वार्ताहर):– येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 87 व्या जयंती निमित्त भेंड्यात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.नेवासा तालुका ग्रामीण पत्रकार संघ,अजब प्रकाशन,कोल्हापूर व श्री ज्ञानेश्वर ग्रंथालय यांचे संयुक्त विद्यमाने दि.13 व 14 सप्टेंबर रोजी भेंडा येथे ज्ञानेश्वर कारखान्याचे ग्रंथालयात दोन दिवसाचे भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात कोणतेही पुस्तक 60 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार दि.13 रोजी सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व कारखाण्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड. देसाई देशमुख,काशिनाथ नवले पाटील,नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सर व्यवस्थापक काकासाहेब शिंदे,संचालिका सौ.लताताई मिसाळ, सरपंच सौ.संगीता गव्हाणे यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन पत्रकार संघाचे संस्थापक सुखदेव फुलारी,अध्यक्ष सुनील पंडित, पत्रकार बाळकृष्ण पुरोहित,कारभारी गरड,नामदेव शिंदे,दिलदार शेख,रमेश पाडळे,सोमनाथ कचरे,अजब प्रकाशनचे मनोज साळुंके,ज्ञानेश्वर ग्रंथालयाचे ग्रंथपाल पोपट उगले यांनी केले आहे.