पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

टीम महाराष्ट्र देशा:-लाडक्या बाप्पाच्या विसर्जणासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. मुंबई – पुण्यात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून घराघरामध्ये उत्साह निर्माण करणारा बाप्पा आज त्याच्या गावी जाणार आहे. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर तो परतीच्या प्रवासाला निघेल. बाप्पा जाणार यामुळे मनात भावना दाटून आलेल्या असल्या तरी विसर्जन मिरवणुकीचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी आहे. यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे. भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू आहे.

तर पुण्यातही गणपती मिरवणुकीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येतोय.पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकामधून सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत शिवसेनेच्या नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यादेखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.दरम्यान पुण्यातील गणपतीच आज मोठ्या थाटामाटात विसर्जन होत आहे. विसर्जन मिरवणुकीची सुरवात ही लक्ष्मी रोडवरुन केली जात आहे. मानाचे पहीले 5 गणपतीसह शेकडो मंडळ सहभागी होत आहेत.

दरम्यान पुण्यातील इतर ही  मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवनुकींना सुरवात झाली आहे. ढोल – ताश्याच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात येत आहे. भव्य मिरवणुका आणि आकर्षक रांगोळ्या पाहण्यासाठी पुण्यात आज मोठ्या संख्यने भाविक येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ८००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसआरपी, सीआरपीएफ, बॉम्ब स्कॉडचा देखील समावेश आहे. तसेच वाहतुकीत देखील काही बदल करण्यात आले आहेत.