गणपती सजावट करणारे थर्माकॉल व्यावसायिक ‘राज’दरबारी

टीम महाराष्ट्र देशा : प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या फायद्याचाच आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदी करण्याआधी या संदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली असल्याचे म्हणत, जनतेचे आणि व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले असल्याचे  पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

दरम्यान, राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यापासून थर्माकॉल व्यावसायिक चांगलेच अडचणीत आलेत. त्यामुळे थर्माकॉल व्यावसायिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन. यावेळी गणपती डेकोरेशनकरिता किमान थर्माकॉल उत्पादनाची विक्री करून द्यावी अशी विनंती राज ठाकरेंना केली आहे. थर्माकॉल व्यवसायात महाराष्ट्रात १४ हजार कारागीर असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. गणपती डेकोरेशन करताना थर्माकॉल बंदी केल्याने गणपती सजावट व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

मागील सहा महिन्याआधी थर्माकॉल उत्पादनाची किमान विक्री करून द्यावी अशी मागणी या व्यावसायिकांनी राज ठाकरे यांना केली होती. मात्र राज्य सरकाराने प्रदुषण बंदी घातली. त्यामुळे महाराष्ट्रातील १४ हजार कारागीर उघड्यावर पडले आहेत असा दावा या संघटनेचे प्रतिनिधी सचिन धाहोतरे यांनी राज ठाकरेंशी बोलताना केला आहे.

स्वातंत्र्यदिनासाठी नव्हे बकरी ईदच्या दिवशी घातपात करण्याचा कट होता : आझमी