महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

शीश महलमध्ये विराजमान झाले कसब्यातील गणराय 

कसबा पेठेतील अजय बाल मित्र मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष  

13

पुणे : कसबा पेठेतील ऐतिहासिक शितोळे वाडयाजवळील अजय बाल मित्र मंडळाने यंदा शीश महलचा देखावा साकारला आहे. मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून विविधरंगी दिव्यांनी शीश महलवर केलेल्या विद्युतरोषणाईने सजलेला हा देखावा पाहण्यास गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

मंडळाचे अध्यक्ष नकुश शितोळे, मार्गदर्शक नितीन शितोळे,तसेच कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे.  नितीन शितोळे म्हणाले, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शीश महलमध्ये गणरायाची मूर्ती विराजमान व्हावी, याकरीता अनेक दिवसांपासून देखाव्याचे काम सुरु होते. चांदीची विविध प्रकारची आभूषणे गणेशाच्या मूर्तीची शोभा वाढवित आहे. प्रतिकृतीवर लावण्यात आलेले रंगी-बेरंगी लाईटस् हे शीश महलचे खास वैशिष्टय आहे.

Related Posts
1 of 727
Comments
Loading...