fbpx

या खेळाडूंची संघात निवड न झाल्याने दादा झाला प्रचंड नाराज

टीम महाराष्ट्र देशा : आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अजिंक्य राहणे आणि शुभमन गिल यांना संघात स्थान न मिळाल्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली आहे.

निवड झालेल्या संघात शुबमन गिल आणि अजिंक्य राहणेला वन डे संघात स्थान न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवड समितीनं सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या या दोघांच्याही नावाचा विचार केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच ट्वीटरवरून गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली आहे.