लाच प्रकरणी गंगापूर तहसीलदाराचा जामीन अर्ज फेटाळला!

औरंगाबाद : लाच प्रकरणात आरोपी असलेल्या गंगापूरचा तहसीलदार अविनाश शिंगटे याचा अटकपूर्व जामीन वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. शेतीच्या कागदपत्रावरील बेकायदेशीर असा शेरा बदलण्यासाठी शिंगटे याने वृद्धाकडे १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आई वडिलांच्या नावावर गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे त्यावर कॉल कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असा असलेला शेरा बदलण्यासाठी त्यांनी गंगापूरच्या तहसिलदारांकडे अर्ज केला होता. त्यानंतर तहसीलदार शिंगटे यांनी सहाय्यक महसूल अधिकारी अशोक मरकड यांच्यामार्फत १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले होते.

अटकेची माहिती लागताच तहसीलदार पसार झाला होता. त्यानंतर शिंगटे याने वैजापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने व सखोल चौकशीसाठी आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे असल्याचा सरकारी पक्षाने केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी शिंगटेचा अटक पूर्व जामीन अर्ज नाकारला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. एस. जगताप यांनी बाजू मांडली.

महत्त्वाच्या बातम्या