fbpx

हरिण व काळविटांच्या उद्रेकामुळे शेतकरी त्रस्त

औरंगाबाद : गंगापुर परिसरात हरिण व काळविटांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक वाढल्यामुळे शेतकरी वैतागला असुन थोड्याफार पावसावर ऊगवलेल्या विविध पीकासाठी शेतक-यांना रात्रभर जागुन काढावी लागत असल्याने यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा अशी मागणी होत आहेत. तालुक्यात सर्वात कमी प्रमाणात पाऊस पडल्याची नोंद शासन दरबारी आसुन जेमतेम पडलेल्या पावसावरच विविध पीके आली तर काही जमिनीबरोबर असून बहुतेक बियाणे पावसाअभावी उगवले नाहीत. जेमतेम पावसावर आलेल्या पिकांचे संगोपन करण्यासाठी शेतक-यांना काळविट हरणांच्या ऊद्रेकामुळे रात्र जागुन काढावी लागत आहे.तालुक्यात सिध्दनाथ वाडगांव, तांदुळवाडी, भालगांव, शहापुर, पळसगांव, बोलठाण, डोमेगांव, बोरगांव, अंबेलोहळ, राजुरा, मलकापुर,घोडेगांव, कनकोरी, कोळघर, मालुंजा, झोडेगांव, खोपेश्‍वर, वजनापुर, शेकटा, कोबापुर, भोयगांव, डीघी, येसगांव, सिरजगांव,आदीसह अन्य काही गावात हरिण व काळविट मोठ्या प्रमाणात आसल्याने यामुळे शेतक-यांचा हाता तोडांशी आलेला घास हिरावून घेत असल्याने शेतकरी मोठा संकटात सापडला आहे. विविध गावातील शेतक-यांनी शासन दरबारी हरिण व काळविटाचा बंदोबस्त करण्यात यावा यासाठी अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रार नोंदवल्या पंरतु काहीच उपयोग झाला नसल्याने होत असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मात्र या बाबत वनविभागास कोणतेही सोयर सुतक नसुन शेतक-यांच्या झालेल्या मालाची नुकसान भरपाई देऊन यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहेत.