डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ‘गंगामाई’च्या चालकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद :फुलंब्री – खुलताबाद रस्त्यावरील बाजारसावंगी फाट्यावर मंगळवारी (दि. 2) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास रस्ता बनवण्याच्या मशीनला मोटारसायकल धडकून जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात तालुक्यातील किनगाव येथील शिवनाथ गणेश नामेकर वय 28 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत गंगामाई कन्स्ट्रक्शन मशीन चालकाविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, मयत शिवनाथ गणेश नामेकर हे रात्री दहा वाजता फुलंब्री- वारेगावकडे जनावरांच्या उपचारासाठी गेले होते. ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान किनगाव येथे त्यांच्या घरी येत असताना त्यांना बाजार सावंगी फाट्यावर त्यांचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. फुलंब्री – खुलताबाद रस्त्याचे काम सुरू आहे या कामावर बाजार सावंगी फाट्यावर गंगामाई कन्स्ट्रक्शनचे मशीन उभे होते. दरम्यान येथे पर्यायी रस्त्याच्या सुरक्षतेसाठी ब्यारिकेट व मशीनवर रिफ्लेक्ट रेडियम नव्हते. तसेच सदर मशीन रॉंग साईडला उभे केलेले होते. त्यामुळे सदर अपघात घडून आला असून गंगामाई कन्स्ट्रक्शनच्या मशीन चालकांवर फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात गंगामाई कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्याचा मागणीसाठी नातेवाईकांनी प्रेत घटनास्थळी आणून फुलंब्री -खुलताबाद रोडवर रास्ता रोको केला. त्यामुळे हा रस्ता सुमारे एक तास बंद होता. दरम्यान गंगामाई कन्ट्रक्शनच्या मशीन चालकांवर कलम ३०४A, ३३७, ३३८, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या