राष्ट्रपतींकडून सन्मान झालेल्या CBSE टॉपरवर सामूहिक बलात्कार

टीम महाराष्ट्र देशा- हरियाणामध्ये सीबीएसई टॉपरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोप आहे की, रेवाडी जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेसोबत तब्बल 12 तरुणांनी अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. ही सगळी मुलं नशेत धुंद होती. त्यामुळे त्यांनी या प्रकारानंतर पळ काढला.या 12 युवकांविरोधात हरियाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तक्रार नोंदवतेवेळी पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास नकार दिला असा आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

भारत बंद: आंदोलनाच्या आडून विद्यार्थी नेत्याची हत्या

You might also like
Comments
Loading...