Pune- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शिंदवणे घाटात सामूहिक बलात्कार

उरुळी कांचन – जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली)  घाटामध्ये शुक्रवारी (ता. १६) मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

सदर महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. सदर महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेवून बलात्कार केला व नंतर घाटामध्ये सोडून दिले. सदर महिलेने घाटमधून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वरांच्या  मदतीने फॉर्चूनर गाडीचा नंबर मिळविला आहे. घटनेची लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल असून आरोपीचा शोधास पोलिसांचा पुढील तपास चालू आहे.

You might also like
Comments
Loading...