गणेशोत्सवापूर्वी सगळे खड्डे बुजवा – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : गणेश उत्सवापूर्वी पनवेल-गोवा महामार्गावरील रस्त्यात पडलेले खड्डे बुजवावेत, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या पाहणीसाठी मंत्री पाटील आज सकाळी पनवेलमध्ये आले. त्यांनी येथील खड्ड्यांची पाहणी केली आणि शासकीय विश्रामगृह येथे बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

पनवेल-गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने तो धोकादायक बनला होता. त्यातच गणेशोत्सव लवकरच सुरु होत असल्याने लोकांमध्ये खड्ड्यांवरून नाराजी होती. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणीसाठी आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी पनवेल गाठले. खड्ड्यांची पाहणी करून विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्याLoading…
Loading...