गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीवरून राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं गणेश मंडळांना परवानगी नाकारल्याने, शिवसेना आणि मनसे आमने सामने आलेत. शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले असून, बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा, तुम्हाला कोण अडवतो बघतोच मी असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान गणपती मंडप बांधण्याच्या कठोर नियमांविरोधात मनसेनं शिवसेना भवनासमोर मोठे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेनं शिवसेनवर निशाना साधला आहे. ‘अयोध्याचं मंदिर नक्की बांधा पण त्याच्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवाणगी द्या.’ असं त्या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांआधी ‘मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे’ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले होते.

‘चलो अयोध्या.. चलो वारणसी’ चे आवाहन करणारे होर्डिंग त्यांनी मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले होते आणि आता त्यावर राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी गिरगावच्या खेतवाडीत जाऊन मंडळ अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता.

नमाजाला भोंगे कशाला पाहिजे? घरीच नमाज पठण करा – राज ठाकरे

उद्योगपतींच्या मिठ्या चालतात मग राहुल गांधींची का नाही ? – राज ठाकरे