पुणे : अठरा घाटांवर गणरायाच्या विसर्जनाची सोय

टीम महाराष्ट्र देशा : पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.

विसर्जन मिरवणुकीत पोलिसांइतकीच किंबहूना त्यापेक्षा जास्त जबाबदारी महापालिकेचीच असते. मूर्तीचे विसर्जन होण्यापासून ते कचरा साचलेले रस्ते स्वच्छ करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामे महापालिकेला करावी लागतात. त्यामुळेच विसर्जन मिरवणूक महापालिकेसाठीही कसोटीचीच असते. शहरात एकूण १८ घाट आहेत. त्या सर्व ठिकाणी महापालिकेने नदीपात्रात विसर्जनाची तसेच तिथेच लोखंडी हौद बांधून हौदात विसर्जनाचीही व्यवस्था केली आहे. नदी नाही अशा एकूण ८२ ठिकाणी लोखंडी हौद उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय विहीर, कॅनॉल, बांधीव हौदांमध्येही विसर्जन केले जाते. तिथेही महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत.

दरम्यान, – गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यानंतर काल पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डिजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती विसर्जन न करता जागेवरच गणपती ठेवणार अशी अडेलतट्टूपणाची भूमिका मंडळांनी घेतली आहे.डीजेला परवानगी न दिल्यास, यंदा श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करता मूर्ती मांडवातच ठेवण्याचा इशारा गणेश मंडळानी शनिवारी दिला असून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

VIDEO : पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

You might also like
Comments
Loading...