fbpx

नवसाला पावणारा वाई येथील ढोल्या गणपती

सातारा : सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थंक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणा-या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरो ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व आबालवृध्द गणेश भक्त आणि येथे येणार्‍या पर्यटकांचे आवडते स्थान आहे. नवसाला पावणारा म्हणून या गणपतीची देशभर ख्याती आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.

गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्ती मुळे या गणपतीला ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णानदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणा-या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्‍चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देेउन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे.
त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाउन पाण्याचा दाब कमी होतेा व मंदिर सुरक्षित रहाते. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौेथ-यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर व 80 से.मी. उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोडेची मूर्ती आहे.तिची स्थापना शके 1691 वैशाख शु. 13 रोजी करण्यात आली. मूर्तीचे स्वरुप बाळसेदार असल्याने त्याला कदाचित ढोल्या गणपती असे नामाभिधान प्राप्त झाले असावे.

मूर्ती एकसंध काळ्या दगडात खोदलेली असून हा दगड कर्नाटकातू आणला आहे. सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे.त्यामूळे मूतीचे मूळ रुप दिसत नाही. हा गणपती उकिडवा दोन्हा मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस यज्ञोपवीतसह माजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील पभिावळ अर्धचंद्राकृती 3 मीटर 63 सेमी इतकी उंच आहे.

गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तुशास्त्रज्ञांनी छताला पाषाणाला खाचा पाडून त्यात दुस-या दगडांना अणूकुचीदार टोके करुन ती त्यात घुसवली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईंतील सर्व मंदिरात सर्वात उंच असून त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची 24 मीटर आहे. दररोज महाबळेश्‍वर, पाचगणी येथे पर्यंटनाला आलेले हजारो पर्यंटक वाईत येउन न चुकता दर्शन घेतात. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी पहायला मिळते.