नवी मुंबई : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन केले. तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करून, ३९० झाडांची कत्तल करत कोपरी उड्डाणपुलाच्या निर्मितीचा घाट घातला जातोय, याला राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र भाजप आमदार गणेश नाईक यांनी देखील आजच लॉंग मार्च काढत चिपको आंदोलन केल्याने जितेंद्र आव्हाडांनी नाईकांवर जोरदार टीका केली आहे.
२००८ साली या उड्डाणपुलाचा ठराव यांनीच केला होता, त्यामुळे नवी मुंबईच्या जनतेची यांनी माफी मागावी असे आव्हाड म्हणाले. मात्र केवळ ५ मिनिटात जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन आटोपत घेतल्याने कार्यकर्त्यांची मात्र निराशा झाली. त्यामुळे केवळ मीडिया बाईटसाठी रस्त्यावर उतरलेल्या आव्हाडांची भाजपाच्या आंदोलनामुळे निराशा झाल्यानेच त्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला असल्याची चर्चा रंगते आहे.
नवी मुंबई चे वाटोळ करण्याचे काम एकच माणूस गेले अनेक वर्ष करत आहे, त्या माणसाचे नाव गणेश नाईक आहे. तो माणुस स्वार्थाचा आहे. जो माणूस बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही, जो माणुस शरद पवारांचा झाला नाही, ज्यांनी त्यांचा सत्तेचा अख्खा वाटा दिला. तो तुमच्या नवी मुंबई करांचा काय होणार ओ? त्यांनी नवी मुंबईच्या जनतेची माफी मागायला पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या :