ठाण्यातून नाईक तर कल्याणामधून आव्हाडच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या व जेष्ठ नेत्यांची बुधवारी बैठकी पार पडली .अंतर्गत कलह बाजूला ठेऊन निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश सर्वच पदाधिकाऱ्यांनी देण्यात आले आहेत. आगामी ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाण्यात राष्ट्रवादीचाचं खासदार असेल, असा विश्वास सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ठाणे शहराचा खासदार राष्ट्रवादीचा झाल्यास त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीसह २०२२ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये माजी मंत्री गणेश नाईक हे ठाणे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मागील वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा का पराभव झाला, त्याची कारणे काय होती, आता कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.आम्ही सर्व एक जोमाने काम करू आणि मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते राष्ट्रवादीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास प्रत्येकाने दिला.

पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठी शरद पवार यांनी गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा आणि जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण लोकसभा लढवावी, असे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी झालेल्या चर्चेत गणेश नाईक यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांना कल्याणमधून निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली .