पुणे : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
दरम्यान, आता सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला याबाबत कळकळीचे आवाहन केलं आहे. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्यासंबंधी सूचना दिली आहे. हा इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे. गणेश भक्तांनीही कोरोनाविषयक नियम पाळून सण साजरा करावा, अशी कळकळीची विनंती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. @rajeshtope11 यांनी केली आहे.
— NCP (@NCPspeaks) September 7, 2021
‘गणेशोत्सव हा सर्वांसाठी उत्साहाचा असा सण आहे. दहा दिवस सर्वच गणेशभक्त आनंदाने हा उत्सव साजरा करतात. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व सूचनांचे पालन करुन सण साजरा करायला हवा. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्यासंबंधी सूचना दिली आहे. हा इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे. गणेश भक्तांनीही कोरोनाविषयक नियम पाळून सण साजरा करावा, अशी कळकळीची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बेळगावात मराठी माणूस हरला नसून शिवसेना हरली आहे’, भाजपचा टोला
- आधी भानगडी करणारेच सरकारमध्ये होते, तर ईडी कशाला कारवाई करेल?; भाजपचं पवारांना प्रत्युत्तर
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला तातडीने १०० कोटी रुपये द्या; नरेंद्र पाटील यांची मागणी
- ‘मोहन भागवत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले..’
- ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार