परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या गणेश मंडळांना देणार पुरस्कार

सोलापूर : गणपती उत्सवात अापला परिसर स्वच्छ ठेवा. जे मंडळ यासाठी विशेष योगदान देईल त्याची महापालिका पोलीस प्रशासनाकडून पाहणी होईल. या स्वच्छता उपक्रमात सहभागी होणाऱ्या मंडळाना खास पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, असे अावाहन महापालिका अायुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी केले. पोलीस अायुक्तालयात गणेशोत्सव मंडळ शांतता कमिटीची बैठक झाली. या वेळी श्री. ढाकणे बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस अायुक्त महादेव तांबडे, उपायुक्त नामदेव चव्हाण, अपर्णा गीते, पौर्णिमा चौगुले उपस्थित होते. संभाजी तलावात गणपती विसर्जन करण्यात येते. यंदा त्याएेवजी दुसरा काही पर्याय समोर येईल का? याबाबत मंडळांनी सूचना द्याव्यात असे श्री. ढाकणे म्हणाले.  जय हनुमान मंडळ, दक्षिण सदर बझार (तृतीय), जय हिंद चौक, नवीपेठ (द्वितीय), सिद्धार्थ तरुण मंडळ, भवानीपेठ (प्रथम) यांना पोलीस अायुक्तालयातर्फे पुरस्कार देण्यात आले. विजापूर रोडवरील पंचमुखी गणपती मंडळांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात अाला.