गणेश मंडळांनी देखाव्यांमध्ये सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे

beti bachao ganpati

जळगाव : गणेश मंडळांनी गणपतीची आरास, देखावे सादर करतांना त्यामध्ये अवयवदान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, साक्षरता अभियान यासारख्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज केले.

Loading...

येथील मंगलम हॉल येथे गणेशोत्सव व बकरी ईद निमित्त जिल्हा शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, तहसीलदार अमोर निकम, महानगरपालिकेचे शहर अभियंता भोळे, महावितरणचे अभियंता तडवी यांचेसह शांतता समिती सदस्य, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले की, गणेशोत्सव जगभर साजरा केला जातो. जिल्हयातील अनेक गणेशमंडळांना 100 वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आपण आपले सण व उत्सव शांततेत साजरे करु. शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या विविध उपयोगी सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन देतांना त्यांनी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.

सण, उत्सवांच्या कालावधीत तांत्रिक कारण व्यतिरिक्त लोडशेंडीग होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. विर्सजनाच्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात येईल. गणरक्षकांनी पोलीस मित्र म्हणून काम करण्याचे आवाहन करतांनाच जिल्हयातील प्रत्येक गावांमध्ये एक गाव, एक गणपती ही संकल्पना, गुलालविरहित मिरवणूक काढण्याचे आवाहनही त्यांनी गणेशमंडळांना केले. तसेच शास्त्री चौकात हरतालिका व गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य विक्रीस परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सण व उत्सावांमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सामाजिक सलोखा वाढीसाठी सर्व धर्मगुरुंच्या व मान्यवरांच्या हस्ते दररोज महाआरती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सोशल मिडीयावर चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांवर कठोर कारवाई – दत्तात्रय कराळेजळगाव शहराची गणना पोलीस दरबारी संवेदनशील शहर अशी आहे. मात्र आपल्या सर्वाच्या सहकार्याने गाव, शहर व सण, उत्सव आपले आहे याची जाणीव ठेवून सामाजिक सलोखा राखून या शहराचे रुपांतर संवेदना आणि शील (चारित्र्य) असलेल्या गावांत करु या असे आवाहन पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश दिसून आल्यास त्वरीत पोलीस विभागास कळविण्याचे आवाहन करतानाच सायबर सेलच्या माध्यमातून असा संदेश पाठविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलीस हा पण एक नागरीकच असतो. तेव्हा सण, उत्सवाच्या काळात जळगावकर नागरीकांनीही पोलीस बनून पावित्र्य आणि मांगल्याचे सण उत्सावात साजरे करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलतांना अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून विर्सजनाच्या ठिकाणी आवश्यक ती सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.बैठकीच्या प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे म्हणाले की, जळगाव शहरातील कार्यकत्यांचे चांगले सहकार्य असते. शहरवासियांच्या सहकार्यातून सामाजिक सलोखा राखून सण, उत्सव आनंदाने साजरे करु या. यावेळी सार्वजनिक गणोशोत्सव व शांतता समितीच्या सदस्यांनी व उपस्थितांनी उपयुक्त सुचना केल्या.Loading…


Loading…

Loading...