VIDEO : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात

पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाची सुरवात मनाचा गणपती कसबा गणपतीची आरती करून झाली आह्रे. पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आरती करून सकाळी साडे दहा वाजता श्रींच्या मिरवणुकीला सुरवात झाली.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, खासदार संजय काकडे, अनिल शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे शरद रणपिसे, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, नगरसेविका मंजुषा नागपुरे हे देखील यावेळी उपस्थित होते उपस्थित होते.