fbpx

सरकारमधील विसंतगीमुळेच बाप्पांच्या विसर्जनात विघ्न : सचिन अहिर

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे मुख्यमंत्री एक म्हणतात तर शिवसेनेचे पक्षप्रमुख एक म्हणतात. राज्य सरकारमधील विसंगतीमुळेच बाप्पांच्या विसर्जनात विघ्न येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष, माजी मंत्री सचिन अहिर यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं हा निकाल जाहीर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना अहिर यांनी हा आरोप केला आहे.

पुढे बोलताना गणेश मंडळांनी या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जावून जाब मागावा असे आवाहन सचिन अहिर यांनी गणेश मंडळांना केले आहे. या प्रकरणात तोडगा काढण्यास सरकारलाच रस नाही आहे. सरकार कोर्टात नकारात्मक भूमिका मांडत आहे. सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच कार्टाने हा निर्णय दिला आहे असे अहिर म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment