मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गणेशोत्सवाचा शुभेच्छा; पहा काय म्हणाले मोदी

आज महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे गुरूवारी आगमन होत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात मोठे उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या निमित्ताने खास मराठी भाषेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरूवारी एका कार्यक्रमा दरम्यान मोदींनी मराठी भाषेतून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूश केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी अचानकपणे मराठीत बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीला उपस्थितांना थोडे आश्चर्य वाटले मात्र पुढे लगेचच मोदींनी ‘’गणेशोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो’’, असे म्हणत भाषणाचा समारोप केला. पुण्याच्या भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काल सायंकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले.