‘आला आला आला माझा गणराज आला’

पुणे : लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालेले आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात भक्तांनी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.
गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. बाप्पाच्या पूजेचे साहित्य, आरास, सजावटीचे साहित्य, मोदक, लाडू, पेढे खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये बुधवारी मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळे आणि कुटुंबे सज्ज झाली आहेत.

अनेक कुटुंबीयांनी बुधवारी सकाळपासूनच गणरायाची मूर्ती घरी नेण्यास प्राधान्य दिले होते. ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या गजरात बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी अबालवृद्धांचा उत्साह पाहण्याजोगा होता. दगडूशेठ हलवाई मूर्ती, पुणेरी पगडी, गरुडावर बसलेला गणपती, उंदरावर बसलेल्या गणपतीला घरगुती गणपतींसाठी सर्वाधिक मागणी होती.

You might also like
Comments
Loading...