जाणून घ्या पुण्यात मानाच्या पाच गणपतींची कधी होणार प्राणप्रतिष्ठापना ?

'आला आला माझा गणराज आला'

पुणे : लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये ढोलताशाच्या गजरात जल्लोषात आगमन होत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात भक्तांनी आपल्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जात असून  गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात काढलेल्या गणेशमूर्तींच्या मिरवणुका व फुललेल्या बाजारपेठा यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे.

कसबा गणपती : पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 55 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी सकाळी सव्वादहा वाजता उत्सव मांडवापासून मिरवणूक निघणार आहे देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल ताशा पथक आणि प्रभात बँड पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल.

तांबडी जोगेश्वरी : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना बांधकाम व्यवसायिक अमोल रायकर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. शनिवार पेठेतून पारंपरिक चांदीच्या पालखीची मिरवणूक निघेल.

गुरुजी तालीम : मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीची प्राणप्रतिष्ठापना उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते दुपारी एक वाजता होणार आहे.

तुळशीबाग गणपती : मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान अन्नछत्राचे संस्थापक जन्मेजय राजेभोसले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

केसरीवाडा : मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना डॉक्टर रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. श्री केसरीवाडा गणपतीची मिरवणूक पारंपरिक चांदीच्या पालखीतून निघेल .

You might also like
Comments
Loading...