मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये श्री गणेशाची स्थापना

manmad-express-ganpati

मनमाड : मनमाड कुर्ला एक्सप्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजतगाजत गणरायाचे स्वागत करून गोदावरीच्या राज्याची विधिवत स्थापना करण्यात आली. मनमाडच्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या हस्ते श्री गणेशाही पहिली आरती करण्यातर योगेश कातकाडे यांच्या कुटुंबीयाकडून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनंजय आव्हाड यांच्यासह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये सर्व धर्मीय प्रवाशी दरवर्षी एकत्र येत या एक्सप्रेस मध्ये श्रीगणेशाची स्थापना करत असतात. यंदाचे हे २१ वर्ष असल्याने प्रवासी संघटने कडून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष धनंजय आव्हाड यांनी दिली आहे.

गोदावरी एक्सप्रेस मध्ये दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात त्याप्रमाणे यंदाही पाणी वाचवा जीवन वाचवा, शेतकरी आत्महत्या रोखा,बेटी बचाव बेटी पढाव, जलदान महत्व यासारखे पोस्टर गाडीत लावण्यात आले असून सामाजिक संदेश देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी मनमाड गोदावरी एक्सप्रेसमधील सर्व धर्मीय प्रवाशी वर्ग एकत्र येऊन गोदावरीच्या राजाची स्थापना करून सामाजिक समतेचा संदेश देत असतात. यासाठी दरवर्षी श्री गणेशासाठी वर्गणी गोळा केली जाते. गोळा केलेल्या वर्गणीतून गोदावरी एक्सप्रेस मध्ये दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रसादाचे वाटप केले जाते. तसेच भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. दहा दिवस समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती केली जाते.

विशेष म्हणजे दरवर्षी गोळा करण्यात आलेल्या वर्गणीतून मंदिर, मज्जीत, गुरुद्वारा यांना रंगरंगोटी, अनाथ मुलांना अन्नदान,बोर्डिंग मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, ट्रेन स्वच्छता, प्रवाश्यांना, पोलिसांना मदत असे विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे या गोदावरी एक्सप्रेस मधील गणेशोत्सवाला विशेष महत्व आहे.